#भुतांच्या_गोष्टी #बाळा_झोप_रे आई माझंच नाव का गं ‘शशिकांत ‘ठेवलंय माझ्या

Suhani


twitter thread from Suhani
#भुतांच्या_गोष्टी
#बाळा_झोप_रे
आई माझंच नाव का गं ‘शशिकांत ‘ठेवलंय माझ्या मित्रांचे नाव बघ किती फॅशनेबल ठेवले आहेत! कुणालाच आवडत नाही माझं नाव !! सगळेजण मला शशी ग शशी म्हणून चिडवतात !!शशि ओरडला आणि मग त्याची आई अर्चना भानावर आली. तिला आठवलं की त्याच्या उजव्या हाताला आणि
1
डाव्या पायाला एक बोट जास्तीचे आहे!हळूहळू तिच्या सगळ्याच स्मृती चाळवल्या गेल्या! लहानपणी तो पाळण्यात फार रडायचा जिवाच्या आकांताने ओरडू लागायचा म्हणून उपाय म्हणून शेवटी त्याच्या आजोबांनी त्याच नाव कुळातल्या प्रथम पुरुषांच्या नावाने ठेवल्याने तो रडायचा थांबला पण पुढे जाऊन तेच नाव
2
इतके प्रश्न निर्माण करेल असं तिला वाटले नाही. तो तणतण करत निघून गेला अन् मोबाईलची रिंगटोनने ती भानावर आली. पलीकडून मधु आत्याचा आवाज आला. ‘अहो वहिनी ऐकलं का रमा दादांचा फोन आला होता वाड्याच्या वाटण्या करायला घेऊ म्हणत होता तो ! सगळे हजर असतील दिवाळीच्या सुट्ट्यांच्या वेळी,
3
त्यावेळी आपण वाटण्याच बघू! इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. अर्चनाला वाडा आठवला त्यातील एका आत्म्याचे भयानक अस्तित्व ! कुणालाच नको खरं तर हा वाडा पण लोकांना मरेपर्यंत लोभ काही सुटतं नाही! असं म्हणून तिने उसासा सोडला.
अचानक दोन दिवसांनी शशिकांतने काॅलेजला सुट्ट्या लागल्या म्हणून.
4
शिशिर सोबत जायचं ठरवलं. शिशिर म्हणजे मधु आत्याचा मुलगा शिशिर त्याचे काही खास मित्र आणि मैत्रीण म्हणून त्यांच्या गावी जात‌ होते त्या दोघांची खास गट्टी होती म्हणून शिशिरने शशीला पण सोबत घ्यायचे ठरवले होते. आई नको म्हणत असताना देखील तिच्या परवानगी शिवाय तो निघाला होता वडिलांना
5
विचारायची काही गरचज नव्हती कारण ते सतत परदेश दौर्‍यावर असतं.गावेच्या वाटेला जशी मिनी बस लागली तसे सगळे निवांत झाले गौरी,शिशिर,अखिल,भारत,अमोल, कबीर आणि मयुरी सगळेच पेंगायला लागले पण शशिला काही झोप येईना. गाव जवळ जवळ येत होते तसे अंधारात पण धुरकट पांढ-या रंगाची सावली त्यांचा
6
पाठलाग करताना त्याला दिसत होती. वाड्याजवळ येताच गाडी थांबली आणि ती आकृती अचानक नाहीशी झाली होती.वाडा पडक्या अवस्थेत होता.कोण इतक्या रात्रीच आलं हे बघायला धोंडिबा टाॅर्च घेऊन आला त्याला ही सगळी मुलं दिसली. वाड्यात काही राहता येणार नाही असं म्हणत त्याने गाडीत बसून गाडी पुन्हा
7
गावाच्या मध्यात न्यायला सांगितली,तितक्यात एक विचित्र चित्र त्यांना दिसले दोन मांजरी तिथून निघत असताना अनाकलनीय हालचाली करत होत्या एक विव्हळत होती तर दुसरी आरामाने हात पाय चाटून पुसून स्वच्छ करत होती.गावात येताच बटाईने शेत दिलेल्या जगनकडे सगळ्यांनी मुक्काम केला.रात्री सगळे झोपले
8
पण शशिकांतला काही झोप येईना तिचं स्थिती मयुरीची होती, शेवटी पहाटे पहाटे त्या दोघांना डोळा लागला.एका वेगळ्याच चैतन्याच अस्तित्व त्यांना जाणवत होतं. शशिकांत आणि शिशिर मित्र-मैत्रिणींसोबत शेतीकडे जाऊन आले. बोर, चिंचा, हरभर्‍याचा मळा,ओंब्या असा सगळा गावरान मेवा ते चाखून आले होते.
9
गावाकडे येताना पुन्हा त्यांची पाऊले वाड्याकडे वळाली. वाड्याचे दार उघडल्या उघडल्या एक विचित्र सडक्या रक्ताचा आणि मांसाचा कुबट वास येऊ लागला.पहिल्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असताना त्याला एका भयाण शुन्य पोकळीत जात आहोत असा आभास झाला.एका विचित्र अशा चुंबकीय लहरी त्याला स्वतःकडे
10
ओढत आहेत असा भास त्याला होत होता. त्याने बाजुला बघितले त्यांच्या सोबतचे सगळेजण आनंदाने हसत खेळत होते तो मात्र घाबरला होता त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता.अचानक एक दरवाजा चिरकन चिरकतोय असा त्याला आवाज आला, आपसूकच त्याची पाऊले त्या दरवाजाकडे वळली गेली इतक्यात जगन जोरात ओरडला
11
कशाला जाताय तिकडे? शशिकांत जोरात चपापला! इकडचा दरवाजा बंद करायला चाललो होतो! तिकडं कुठं दरवाजा हाय वो! तितक्यात झटकन मान वळवून त्याने भिंतीकडे बघितले तर दरवाजा गायब होता मग आता त्याने पाहिले ते गायब होते. तितक्यात शिशिर म्हणाला चला रे तुम्हाला बुरूजाची मागची बाजू दाखवतो.शशिची
12
पाऊले काही त्याची साथ द्यायला ‌तयारच नव्हती.पायात जसा काय कुणी साखळदंड घातला आहे, हत्तीच्या पायात घालतात तसा असा त्याला भास होऊ लागला.पण अचानक मयुरीने त्याचा हात धरला तोच अचानक साखळी सुटावी असा‌ भास त्याला झाला.
आता पुन्हा बुरूज बघून त्यांची वापसी जगनच्या घराकडे झाली. पुन्हा
13
रात्र झाली की तेच चित्र!धुसर होत जाणारी आणि पुन्हा त्याच्या जवळ येत येत गडद होऊन गायब होत जाणारी आकृती!तो दचकून जागा झाला.स्वप्न की सत्य,भास की भ्रम त्यालाच सांगता येईना.त्याला जाग आलेली पाहून मयुरी त्याच्या जवळ येऊन बसली.काय झालं तुला? पाणी आणू का? तिने विचारलं पण शशि
14
इतका गांगरलेला होता की त्याचं त्याला सुधरेना!त्यांची नजर दूरवर असलेल्या वाड्याकडे गेली! तर त्या बुरूजावर एक बाई नवारी पातळ नेसून मांडी घालून बसलेली होती आणि तिचा पदर माळवदापर्यंत येत होता.त्याने नजरेनेच मयुरीला तिकडं बघायला सांगितले पण तिला काहीच दिसेना.झोप तू! अस म्हणून मयुरी
15
झोपायला गेली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिशिरने पुन्हा वाड्याचा रस्ता धरला! आता तिकडे कशाला जत्रेत जाऊया ना ! असा सगळ्यांनी सूर काढल्यानंतर, बरं ठिक आहे संध्याकाळी का होईना जावे लागेल कारण आईला वाड्याची जागा मोजून आईला एकूण क्षेत्रफळ सांगायचे आहे! सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि
16
सगळे जत्रेत फिरायला गेले. शशिकांत मात्र अस्वस्थ होता त्याच लक्ष कशातच लागेना. तो एका छोट्या खेळण्याच्या दुकानासमोर थांबला आणि फटाके फुटण्याचे आवाज यावे तसे सगळेच खुळखुळे जोरजोरात वाजत होते आणि त्याला अस‌ वाटल की कुणीतरी त्याच्यासमोर उभा राहून जोरजोराने हसतयं त्याच्या शर्टाला
17
झोंबतय काय होतं ते त्याला कळेना! त्याने डोळे गच्च मिटले कानावर हात ठेवले! थोड्या वेळाने तो स्वतः चा स्वतः ची भानावर आला त्याने जवळच्या एका हाॅटेलात जाऊन पाण्याने भरलेला मग घेतला आणि स्वतः च्या तोंडावर पाणी मारलं, थोडं स्वस्थ वाटल्यावर एका बाकड्यावर बसून राहिला. सगळ्यांची जत्रा
18
फिरून झाली. सगळे परतेपर्यंत संध्याकाळ झाली.शिशिर वाड्याकडे निघाला जवळ येताच त्याने नोंदवही आणि टेप काढला बाकीच्यांनी माप काढत मोजायला सुरुवात केली. शशिकांतची पाऊले पुन्हा त्या शेवटची भिंतीकडे वळाली. संध्याकाळी सातची वेळ दाटून आलेला अंधार त्याची ती उत्सुकता ताणल्या गेली.एकटक
19
त्या भिंतीकडे नजर जाताच ती बाई अचानक सगळ्यात वरच्या बाजूला दिसली. तो घाबरला ! त्याची स्थिती मंद झाली! कुणीतरी जखडून ठेवल्यासारखे त्याला हालचाल करता येईना. तितक्यात भिंतीतून ती बाई प्रकट झाली! चेहऱ्यावर साडलेलं मांस! भेगाळलेला चेहरा! जागोजाग मांस गळून हाडाच दृश्य हे सगळं फार
20
अकल्पित होतं! बाळा झोप रे! असा स्पष्ट आवाज त्याला ऐकू आला! आता त्याला आठवलं गेल्या कित्येक दिवसांपासून तो याच आवाज कानाशी आल्याने झोपत नाहीये! पण त्याला काय आणि कसं हे सुधरतच नव्हतं! तितक्यात मयुरी आली! तिने त्याला खसकन ओढलं! ‘अरे चल ना’ इथ काय बसलास शरीराची गुंडाळी करून!
21
चल लवकर! झालंय वाडा मोजून! आपसूकच त्याची नजर तिच्या हाताकडे गेली! त्यावर भगवान नरसिंहाचा मंत्र होता. याच चिन्हाने त्याला वाचवलं! ‘चल’ असं म्हणून तो हातपाय झाडत उभा राहिला आणि निघाला. थोड्याच वेळात ते जगनच्या घरी पोहोचले. जगनची म्हातारी आई त्यांच्या नजरेस पडली! म्हातारीचे वय
22
जवळपास ब्याण्णवच्या जवळपास होते पण बुद्धी अजूनही शाबूत होती.ती शशिकांत जवळ आली आणि म्हणाली अरे पोरा तुझ्या हाताला आणि पायाला हे सहावे बोट हाय ! तू जाऊ नगस रे वाड्याकडे तू जीता राहणार नाहीस असं म्हणून तिने जगनला बोलावले आणि त्याला म्हणाली वाटेला लाव या पोरांना सकाळी. जगनने फार
23
खोदून विचारल्यावर तिने सांगितले या तुमच्या घराण्याचा आद्यपुरूष म्हणजे सूर्यकांत फार मोठा कर्तृत्ववान सरदार होता. राजाकडून फार मोठी बिदागी मिळाली होती त्यात त्याला जवळ पडायचं म्हणून त्याने इथं वाडा बांधायला सुरुवात केली पण वाडा चढेना कुणीतरी त्याला सल्ला दिला की ओली बाळांतीण
24
वाड्याच्या भिंतीत पुरून टाक मग बुरूज चढल! त्याने तसंच केलं पण गवड्यांने पैश्यासाठी बाईचा श्वास चालू असताना हे गचाळ काम केलं ! वाडा बांधून झाला पण सरदारांचा वंश पुढे चालेना! वाड्यात पुरलेल्या ओल्या बाळंतिणीचा वावर वाढला. ती तिच्या बाळाला शोधू लागली. मग ऐके दिवशी तिला तिच्या
25

Leave a Reply

Your email address will not be published.